AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
‘या’ पिकाला ५०० रुपये बोनस
भंडारा:धानाला ५०० रुपये बोनस आणि ५०० हेक्‍टरपर्यंतच्या तलावाची मासेमारीकरिता लीज माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकोली येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात केली. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, धानाला यापूर्वी अवघा २०० रुपये बोनस दिला जात होता. त्यात वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्याची दखल घेत यावर्षी धानाला ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासेमारी संस्थांच्या तलावांची लीज कमी करण्याच्या मागणीनुसारदेखील, ५०० हेक्‍टर क्षमता असलेल्या तलावांसाठी आता लीज आकारली जाणार नाही. ५०० ते १००० हेक्‍टरसाठी ६००, तर १००० हेक्‍टरवरील तलावांसाठी ९०० रुपये लीज आकारण्यात येईल. यामुळे मासेमारी संस्थांसाठीदेखील ही आनंदाची बाब आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २५ फेब्रुवारी २०१९
3
1