कृषि वार्ताकृषी जागरण
गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू
मुंबई: राज्य शासनाने खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित ४,५१८ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांमध्ये दुष्काळ उपाय योजनांच्या आठ सवलती देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर
झालेल्या गावांमध्ये जमीन महसूलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले._x000D_ संदर्भ- कृषी जागरण, २२ फेब्रुवारी २०१९_x000D_
13
0
संबंधित लेख