AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Feb 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
हिवाळा संपण्याकडे वाटचाल
राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होईल. उन्हाळी हंगामा सुरू झाल्याचे जाणवेल. सकाळी थंड व दुपारी उष्णता जाणवेल. हिवाळा पूर्णपणे संपलेला नसून तो संपण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. २४ फेब्रुवारीला हवेचे दाब आणखी कमी होतील व हवेचा दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत घसरल्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असेल. २५ फेब्रुवारीला हवेचे कमी झालेले दाब कायम राहिल्यामुळे तापमानात झालेली वाढ ही कायम राहील. २६ फेब्रुवारीला हवेचे दाब आणखी कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके कमी झाल्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असेल. २७ फेब्रुवारीला पुर्व राज्यावर १००८, तर पश्चिम राज्यावर १०१० हेप्टापास्कल हवेचा दाब राहील त्यानुसार तापमानात फरक ही राहील. पावसाची शक्यता नाही.
कृषी सल्ला: १. ज्या भागात पावसाची शक्यता आहे म्हणजेच मराठवाडयातील परभणी, हिंगोली, जालना व विदर्भात तयार झालेली फळे, भाजीपाला, धान्य पिकांची काढणी करून फळे व भाजीपाला बाजारात पाठवावा. त्याचबरोबर मळणी झालेले धान्य उघडयावर ठेवू नये. २. हळद काढणी करून शिजवून वाळत घातली असल्यास ती गोळा करून ताडपत्र्याने झाकून ठेवल्यास नुकसान टाळता येईल. ३. फुलशेतीतील फुले व अंजीर फळे तयार असल्यास काढणी करून माल बाजारात विक्रीसाठी पाठवावा म्हणजेच नुकसान टाळता येईल. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ रामचंद्र साबळे
5
3