AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
बांबू उत्पादनाद्वारे जीडीपी वाढविण्यावर भर - मुनगंटीवार
मुंबई: बांबू हे रोजगाराचे प्रमुख साधन आहे. राज्यात बांबूचा उदयोग क्षेत्रात विकास व्हावा व बांबूचे अधिकाधिक उत्पादन घेऊन देशाचे 'सकल राष्ट्रीय उत्पादन' (जीडीपी) वाढविण्याचा मानस वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्त केला. ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित बांबू उद्योग परिषदेत बोलते होते.
मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील बांबू उद्योग क्षेत्रात विकास व्हावा यासाठी या उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशात बांबूचा वापर निरनिराळ्या उपयोगासाठी केला जातो. गरिबांसाठी बहुउद्देशीय लाकूड म्हणून बांबूस महत्त्व आहे. घरगुती वापरासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. शिवाय याच्या उद्योगासाठी देखील बराच वाव आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे उद्योजकांनी पुढे येऊन उद्योग स्थापन करावे त्यांना आवश्यक ती मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल. संदर्भ – कृषी जागरण, २१ फेब्रुवारी २०१९
9
6