AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
राज्याला कृषी क्षेत्रात सहकार्य करणार ‘हा’ देश
मुंबई: अर्जेंटिना महाराष्ट्राशी करार करून कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मोरिसिओ मॅक्री यांनी राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मॅक्री हे महाराष्ट्राला भेट देण्यासाठी आले आहेत. या भेटीमध्ये मोरिसिओ मॅक्री सांगतात, अर्जेंटिना महाराष्ट्रात एक व्यापारी शिष्टमंडळ पाठवून अन्नधान्य साठवणुकीसाठी अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध सायलो बॅग व इतर तंत्रज्ञान देण्याबाबत चर्चा करेल. त्याचबरोबर केंद्र सरकारसोबत झालेल्या विविध करारांबाबत माहिती देऊन
दहशतवादाविरोधी लढ्यामध्ये आमचा देश भारतासोबत कार्य करेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मॅक्री यांचे आभार मानले. अर्जेंटिनाचे कृषी विकासात सहकार्य लाभल्यास भारताला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास निश्चितपणे मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले. संदर्भ – कृषी जागरण, २० फेब्रुवारी २०१९
0
1