कृषि वार्ताअॅग्रोवन
देशातील सोयाबीन आयातवर बंदी घाला – पटेल
पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी सोयाबीनची आयात सुरू केली आहे. मात्र, आयात होणारे सोयाबीन हे जीएम असून, जीएम बियाण्यांना केंद्र शासनाने बंदी घातली असताना ही आयात सुरू आहे. यामुळे देशातील सोयाबीनचे दर ५० ते १०० रुपयांनी घसरले असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. या दरातील घसरण रोखण्यासाठी तातडीने आयात बंदी करावी, अशी मागणीदेखील त्यांनी भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या अध्यक्षा रिटा तेवलिया यांच्याकडे केली आहे. पटेल म्हणाले, ‘‘सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांना सध्या ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपये असे चांगले दर मिळत असताना, अनेक व्यापाऱ्यांनी परदेशातून सोयाबीन ३ हजार ५०० रुपयांनी आयात करण्यास सुरवात केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजापेठेत सोयाबीनचे दर ५० ते १०० रुपयांनी कमी झाले आहेत. आयात होणारे सोयाबीन जीएम असून, जीएम वाण आयातीला केंद्र सरकारची बंदी आहे. यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने आयात होणाऱ्या सोयाबीनची तपासणी करावी व तातडीने आयात बंदी करावी, असे पत्र अध्यक्षा रिटा तेवलिया यांना दिले आहे.’’_x000D_ याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या अध्यक्षा रिटा तेवलिया यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. या वेळी श्रीमती तेवलिया यांनी याबाबत अधिक तीन संस्था काम करत असून, या विविध संस्थांच्या प्रमुखांशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे पटेल यांनी सांगितले._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोवन, १८ फेब्रुवारी २०१९
1
0
संबंधित लेख