AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Feb 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
उन्हाळा सुरू झाला!
राज्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल. कोकणात कमाल व किमान तापमानात वाढ होईल. किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उत्तरेकडील राज्यात किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस राहील. मराठवाडयात किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पश्चिम विदर्भात ते १२ ते १४ अंश सेल्सिअस, मध्य विदर्भात १३ ते १५ अंश सेल्सिअस, पूर्व विदर्भात १२ ते १४ अंश सेल्सिअस, पश्चिमेकडील राज्यात १५ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. विदर्भ व मराठवाडयात नांदेड जिल्हयात आकाश ढगाळ राहील. १८ फेब्रुवारीला राज्यासह संपूर्ण देशावर हवेचे दाब कमी होतील व ते १०१२ हेप्टापास्कल झाल्यामुळे हवामानात बदल जाणवतील.
कृषी सल्ला: १. ऊन्हाळी हंगामा सुरू झाला असून या हंगामात बागायत क्षेत्रात वेलवर्गीय फळ पिकांची व फळ भाज्यांची लागवड करावी. २. काकडी, कलिंगड, खरबूज लागवडीसाठी योग्य तापमान असून या आठवडयात लागवडीचे काम पूर्ण करावे. ३. उन्हाळी भुईमूगाची लागवड पूर्ण करावी. ४. सुरू ऊसाची लागवड पूर्ण करावी. ५. पाल्याभाज्यांची लागवड सपाट वाफ्यात करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे.
5
4