कृषि वार्ताअॅग्रोवन
‘या’ लाखापर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने
सांगली : केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेबरोबरच जिल्हा बँक नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देणार आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज परतफेड करून शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले आहे. पाटील म्हणाले, एक लाखावर ते तीन लाखांपर्यंत कर्ज पुरवठ्यावर शेतकऱ्यांना २ टक्के व्याज भरावे लागते. पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी २ टक्के व्याजाचा परतावा जिल्हा बँकेच्या नफ्यातून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचा पीक कर्जपुरवठा शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड ३१ मार्च २०१९ पर्यंत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जे शेतकरी पीककर्जाची निर्धारित वेळेत परतफेड करणार नाहीत, त्यांना पीककर्जावर थकतारखेपासून १०.५० टक्के अधिक २ टक्के दंडव्याज असे एकूण १२.५० टक्के प्रमाणे व्याज भरावे लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊन ते शून्य टक्केच्या व्याजाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी परतफेड करून शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले._x000D_ संदर्भ – अॅग्रोवन, १३ फेब्रुवारी २०१९
8
0
संबंधित लेख