AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
व्हॅलेंटाइन डे निमित्त दहा लाख गुलाबांची निर्यात
कोल्हापूर : व्हॅलेंटाइन डे म्हटलं की गुलाबाचे फुले आलेच. या फुलाशिवाय हा डे साजराच होऊ शकत नाही त्यामुळे या दिवसात या फुलाला प्रचंड मागणी असते. ही मागणी देशात नव्हे, तर संपूर्ण जगात असते म्हणूनच या डे निमित्त कोल्हापूरवरून दहा लाख गुलाबाच्या फुलांची निर्यात करण्यात आली आहे. कोल्हापूरांच्या फुलांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, कुवैत व जपानमधील प्रेमी आपले नाते दृढ करणार आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दहा लाख गुलाब फुलांची निर्यात परदेशात करण्यात आली. या काळात लाल रंगाच्या गुलाबाला अधिक मागणी असते. एकूण निर्यातीपैकी आठ लाख लाल गुलाब असल्याचे सांगण्यात येते. कोल्हापूर भागातील मोठे निर्यातदार असलेल्या श्रीवर्धन बायोटेकमध्ये गत पंधरा दिवसांपासून गुलाब निर्यातीची धांदल सुरू आहे. निर्यातीशिवाय स्थानिक बाजारपेठेमध्येही गुलाब फुलांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित असून, पॉलिहाउसमध्ये उत्पादन घेणाऱ्या अनेक गुलाब उत्पादकांनी स्थानिक बाजारपेठेसाठी नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन बायोटेक येथे गुलाबाच्या पंधराहून अधिक जातींचे उत्पादन घेतले जाते. त्यात लाल रंगाच्या पॅशन, फर्स्टरेड, टेम्प्टेशन, ग्रॅंडगाला, रॉयल बकारा या जातींना चांगली मागणी असते. याशिवाय जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड ही फुलेही मोहिनी घालतात. संदर्भ – राजकुमार चौगुले-अॅग्रोवन, १३ फेब्रुवारी २०१९
1
0