AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Feb 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
आता, थंडी होणार कमी!
१५ फेब्रुवारीपासून हवेच्या दाबात बदल होऊन ते कमी होत आहेत. उत्तर दक्षिण दिशेने राज्याच्या मध्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होत असल्याने किमान तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. १७ फेब्रुवारीला राज्यावर १०१४ हेप्टापास्कल, तर पूर्व किनाऱ्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. १८ फेब्रुवारीला राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. किमान व कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाची तीव्रता जाणवेल व उन्हाळी हंगामाची सुरूवात झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल.
कृषी सल्ला: १. एकात्मिक शेती फायदयाची – शेतीपुरक व्यवसाय, रेशिम उद्योग इ. नियोजन व्यवस्थित करून एकात्मिक शेती पध्दत यशस्वीपणे करणे गरजेचे आहे. २. जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे – राज्यात बहुतांश जमिनी या नापीक बनत आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादकता घटत आहे हा चिंतेचा विषय आहे त्यावर भविष्यात उपाय करणे आवश्यक आहे. ३. हवामानानुसार पिके पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पध्दत अवलंबिणे – आपल्या शिवारात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व त्याच्या वितरणाचा अभ्यास करून खरीप, रब्बी हंगामात जिरायत क्षेत्रात पीक पध्दत ठरविणे यापुढे अत्यंत आवश्यक पडणार आहे. ४. उन्हाळी हंगामात फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान – उन्हाळा लवकरच सुरू होत आहे. आता, एकूण सुर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल. या परिस्थितीत जेव्हा फळबागांना पाण्याची कमतरता जाणवेल तेव्हा गवताच्या भुशाचे आच्छाधन करावे. ५. जनावरांना पुरेसा चारा व स्वच्छ पाणी पोटभर द्यावे. ६. पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी हंगामात योग्य पिकांची निवड करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डाॅ.रामचंद्र साबळे.
12
16