AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्तालोकमत
शेतकऱ्यांना तारणाशिवाय मिळणार ‘इतके’ कर्ज
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १.६ लाख रूपये केली आहे. जे पहिले १ लाख होती त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. याचा लाभ छोट्या शेतकºयांना होईल, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विकास आणि नियामकीय धोरण निवेदनात म्हटले आहे. २०१० नंतर एकूणच महागाईत वाढ झाली आहे. कृषी
निविष्टांच्या किमतींतही वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन तारणमुक्त कर्जाची मर्यादा १ लाख रुपयांवरून १.६ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे औपचारिक कर्ज व्यवस्थेत छोट्या आणि सीमांत शेतकºयांचा समावेश वाढेल. यासंबंधीची अधिसूचना लवरच जारी करण्यात येईल. भांडवल उभारणीतील दीर्घकालीन कृषी कर्जात घसरण हीसुद्धा समस्या आहे. कृषी कर्जाचा आढावा घेण्यासाठी अंतर्गत कार्य गटाची स्थापना करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला असल्याचे देखील निवेदनात सांगितले आहे. संदर्भ – लोकमत, ८ फेब्रुवारी,२०१९
8
11