कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ!
मुंबई: केंद्र शासनाने अर्थसंल्पात जाहीर केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’ अंर्तगत राज्यातील अत्यल्प व अल्पभूधारक ८० टक्के म्हणजेच सुमारे १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात या शेतकऱ्यांच्या खात्यात ७,२०० कोटी रु. जमा होणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ही योजना राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या १८ वर्षाखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीयोग्य एकूण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल अशी कुटुंबे या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचादेखील या योजनेत समावेश करण्याचा तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत._x000D_ संदर्भ - अॅग्रोवन, ८ फेब्रुवारी २०१९
3
0
संबंधित लेख