हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात थंडीचा कडाका
राज्यात हवेचा दाब १०१६ हेप्टापास्कल इतका वाढल्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. उत्तर राज्यात म्हणजेच नाशिक व धुळे जिल्हयात ८ ते ९ सेल्सिअस, तर जळगाव जिल्हयात ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान राहील. त्याचप्रमाणे मराठवाडयात ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत काही जिल्हयात तापमान राहील. पश्चिमेकडील राज्यात सातारा, पुणे व नगर जिल्हयात किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. विदर्भात १० ते १२ अंश सेल्सिअस राहील. एकूणच या आठवडयात राज्यात थंडीचा कडाका राहील.
कृषी सल्ला:_x000D_ १. उन्हाळी हंगामात पिकांच्या पेरणी व लागवडीसाठी जमिनीची पुर्व मशागत करून हेक्टरी ६ ते ७ टण शेणखत टाकून कुळवाची पाळी देऊन ते जमिनीत मिसळावे._x000D_ २. उन्हाळी हंगामातील पेरणी व लागवड ही थंडी कमी होताच, १५ फ्रेबुवारीपर्यत करावी._x000D_ ३. फळबागा, फळभाज्या व ऊसाचे पीक शक्यतो, ठिबक सिंचन प्रणालीने वापरल्यास ५०% पाण्याची बचत होईल. _x000D_ डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
101
0
संबंधित लेख