कृषि वार्ताअॅग्रोवन
पाहा, राज्यात तूर खरेदीसाठी किती खरेदी केंद्रे सुरू
मुंबई : यंदा केंद्र शासनाने तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी आतापर्यंत १३४ तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच आणखीही काही खरेदी केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतीच दिली.
देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, जर आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापारी तूर खरेदी करत असतील, तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले. _x000D_ या वर्षी राज्यातील तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. ज्या भागात तुरीचे उत्पादन जास्त आहे आणि खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी असेल, त्या भागातसुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. आतापर्यंत १७ हजार २६४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली असल्याचेदेखील माहिती त्यांनी यावेळी दिली. _x000D_ संदर्भ – अॅग्रोवन,७ फ्रेबुवारी २०१९
1
0
संबंधित लेख