AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
कांदा अनुदानास ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ
मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कांद्याच्या दरात झालेली घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये असल्याने राज्य शासनाने २०० रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ ग्राह्य धरण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली असून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
या योजनेपासून कांदा उत्पादक शेतकरी वंचित राहू नये,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देऊन ती ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्ती या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. संदर्भ – कृषी जागरण, ५ फ्रेबुवारी २०१९
2
4