AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्तालोकमत
पाहा, ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’चे मानकरी
वाशिम :कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्कारासाठी नुकतीच राज्य शासनाच्यावतीने कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शासनाने २ फेब्रुवारीला याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. पुणे येथे या शेतकºयांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’साठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांची निवड केली असून, त्यात मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील दिलिप उर्फ रामदास नारायण फुके आणि मालेगाव तालुक्यातील डोंगरेिकन्ही येथील हेमंत वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे. कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सन २०१५ आणि २०१६ करीता कृषी पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांची नावे आली आहेत. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी आयुक्त कार्यालयाद्वारे माहिती देऊन पुणे येथे होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्कारासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. संदर्भ – लोकमत, २ फ्रेबुवारी २०१९
0
0