AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्तालोकमत
पाहा, शेतकऱ्यांनी किती कर्ज घेतले की, शुल्क आकारलं जाणार नाही
नवी दिल्ली- देशातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण केंद्र सरकारने नुकतेच इंडियन बँक असोसिएशन(आयबीए)नं यासंबंधी सरकारी बँकांना निर्देश जारी केले आहेत की, शेतकऱ्यांच्या ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. यामध्ये शेतकऱ्यांना प्रक्रिया, तपासणी शुल्क किंवा सेवा शुल्क भरावे लागणार नाही. कृषी सचिवाद्वारे ६.९५ केसीसीधारकांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांना पत्र लिहिण्यात आलं असून, यात जास्त करून केसीसी धारकांना सुविधा पुरवण्यास सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आयबीएनं लिखित स्वरूपात हे कळवलं आहे. कर्जाच्या रकमेच्या एक टक्का पैसे वसूल केला जात होता. सर्व बँकांच्या कर्ज प्रक्रियेतील शुल्क वेगवेगळं आहे. त्यात कोणतीही समानता नाही. गृह कर्ज किंवा कृषी कर्ज घेतल्यावर या शुल्काचा अतिरिक्त भार पडतो. परंतु शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच कर्ज फक्त कोणत्याही शुल्काविना मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त कर्ज घेतल्यास ही शुल्क वसूल केली जाणार आहे. संदर्भ – लोकमत, ५ फेब्रुवारी २०१९
5
15