AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
शासन कृषी शिक्षण वाढविण्यावर जोर देत आहे : कृषी मंत्री
नवी दिल्ली: सरकार ने कृषी शिक्षणावर जोर देऊन उन्नती केली आहे त्याचबरोबर संबंधित पदवींना व्यावसायिक मान्यता प्राप्ततादेखील दिली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली. पुसा येथील दोन दिवसीय अॅग्री व्हिजन २०१९ च्या चौथ्या संमेलन उद्घाटन समारोहवेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, कृषी शिक्षणाला उपयुक्त बनविण्यासाठी पाचवी डीन समितीच्या शिफारशीं या सर्व कृषी विद्यापीठांना लागू करण्यात आल्या आहेत.
कृषी संबंधित सर्व अभ्यासक्रमांत सुधारित करून यामध्ये जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, जैविक शेती, कृषि व्यवसाय व्यवस्थापन अशा अनेक विषयांचा समावेश केला आहे. सर्व उद्योजकता आणि कौशल्य व्यवस्थापन यांवर भर दिला आहे. त्याचबरोबर चार नवीन अभ्यासक्रम - बीटेक (बायो टेक्नोलॉजी), बीएससी, बीएससी (अन्न न्यूट्रीशियन) आणि बीएससी सिरीक्लचर अशा कार्यक्रमांचादेखील समावेश असल्याची माहिती यावेळी कृषी मंत्री यांनी दिली. सिंह म्हणाले की, ११०० कोटी रुपयांचा एकूण निधीसह राष्ट्रीय कृषी उच्च माध्यमिक शिक्षण योजना सशक्त बनविण्यासाठी राष्ट्रीय कृषी उच्चस्तर उच्च शिक्षण परियोजना सुरू करण्यात आली आहे. तसेच याबरोबरच ग्रामीण भागात कृषी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टूडेंट रेडी’ योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. या दोन दिवसीय या अॅग्री व्हिजन कार्यक्रमात पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आशा अनेक राज्यातील शेतकरी व कृषी महाविद्यालयातील विदयार्थी सहभागी झाले होते. संदर्भ – कृषी जागरण, २९ जानेवारी २०१९
4
1