कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यात राष्ट्रीय दर्जाचे पशू-पक्षी प्रदर्शन
जालना: राष्ट्रीय दर्जाचे पशू-पक्षी प्रदर्शन राज्यात पहिल्यांदाच जालना येथे भरविले जात आहे. जवळपास वीस वर्षांनंतर अशाप्रकारचे प्रदर्शन महाराष्ट्रात होत आहे. येत्या २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात देशातील विविध जातींच्या गायी, म्हशी, वळू, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कोंबड्या आदी जवळपास एक हजारपेक्षा जास्त पशू-पक्ष्यांचा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे. या या प्रदर्शनासाठी राज्य शासनाने साडेपाच कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. ते म्हणाले, शेतकरी आणि पशुपालकांचे प्रबोधन व्हावे, त्यांच्यामध्ये पशुपालनाविषयी जागृती व्हावी, त्यांना उचित मार्गदर्शन व्हावे, त्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा, धवलक्रांतीचा प्रवाह प्रत्येक पशुपालकाच्या अंगणापर्यंत पोहचावा, या हेतूनेच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली आहे.
देशभरातील विविध राज्यांतील पशुधनाच्या उच्च वंशावळीच्या विविध जाती या या प्रदर्शनात गीर, साहिवाल, थारपारकर, राठी व वेचूर या अधिक दूध देणाऱ्या देशी गायी प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहेत, तसेच सहभागी होणाऱ्या पशूसाठी राहण्याची व्यवस्था व स्टॉलसाठीच्या जागा उभारणीचे काम जोमात सुरू असल्याचीदेखील माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. संदर्भ - अॅग्रोवन, २९ जानेवारी २०१९
1
0
संबंधित लेख