AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Jan 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी आयसाठी मोठे उपाय होण्याची शक्यता- कृषी मंत्री
कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या इशाऱ्यानुसार, केंद्र सरकार कृषी क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी लवकरच मोठे उपाय करण्याची घोषणा वर्तविली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी मंत्रालयाने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील कमतरतेच्या समस्या हाताळण्यासाठी मसुदा तयार केला आहे. या मसुदयामध्ये एक वित्तीय पॅकेज आणि वेळोवेळी पिकांचे कर्ज चुकविण्याकरता व्याज माफी तसेच विविध उपाय प्रस्तावित केले आहेत. कारण पंतप्रधानांच्या कार्यालयातील निती आयोग, कृषी व वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत कित्येक बैठकीनंतर हा मसुदा अंतिम स्वरुपात तयार करण्यात आला आहे. लघु कृषी व्यापार संघ (एसएफएसी) च्या रजत जयंती समारोहमध्ये कृषी मंत्री म्हणाले की, आम बजट पूर्वी किंवा त्याच्या दरम्यान प्रत्येक वर्षी, आम्ही शेतकऱ्यांसाठी काही नवीन घोषणा केले आहे,त्यामुळे यंदा ही शेतकऱ्यांसाठी काही नावीन्यता ही असणार आहे.
कृषी मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी व्यक्तिगत सर्व कृषी योजनांचे निरीक्षण केले जाते. कित्येक योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मागील साडे चार वर्षांत कृषी क्षेत्रासाठी आर्थिक संकल्पात हिस्सा वाढला आहे. ते म्हणाले की, नेहमीच कृषी क्षेत्र सरकारसाठी प्राधान्य आहे, तसेच या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शेतीमध्ये पाणी आणि वीज मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ जानेवारी २०१९
80
0