AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Jan 19, 06:00 PM
कृषि वार्तालोकमत
शासनाकडून राज्याला सर्वाधिक ४ हजार ७१४ कोटींची मदत.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह अन्य दुष्काळग्रस्त राज्यांना ७ हजार २१४ कोटींच्या मदतनिधीस केंद्र सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याला ४ हजार ७१४ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय कमिटीची बैठक झाली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांना ७,२१४.०३ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पदुचेरी, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक जास्त मदत देण्यात आली आहे. या राज्याला जवळपास ४ हजार ७१४ कोटींची मदत जाहीर केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. हा निधी दोन समान टप्प्यात वितरित केला जाईल यामध्ये विदर्भातील ३८ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १,३१५ निधी मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५० टक्के निधी वितरणास मान्यता मिळाली आहे. संदर्भ - लोकमत, २९ जानेवारी २०१९
3
9