हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
थंड व कोरडे हवामान राहील
दिनांक २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.त्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. ३ फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तिथे थंडीची तीव्रता अधिक असेल मात्र मध्य महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी होईल. हिंदी व अरबी समुद्राचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे बाष्पीभवनाच वेग वाढेल.आगामी काळात हवामान ढगाळ राहील.
पुणे जिल्ह्यात कमाल तापमान कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील.तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा ताशी ४ किमी राहील.वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील. संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
8
0
संबंधित लेख