कृषि वार्ताअॅग्रोवन
वनस्पतीतील विषाणूंच्या त्वरित निदानासाठी नॅनोपोर तंत्रज्ञान
विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सर्व सजीवाबरोबरच वनस्पतींमध्ये रोग येत असतात. विषाणूजन्य रोगांवर उपचार करणे अत्यंत कठीण मानले जाते. सीआयआरएडी संस्थेतील संशोधकांनी याम वनस्पतीमध्ये येणाऱ्या दोन विषाणूंचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले आहे. यासाठी त्यांनी नॅनोपोर हे मूलद्रव्यी जीवशास्त्रातील अत्यंत आश्वासक असे तंत्रज्ञान वापरले आहे. या पद्धतीमुळे केवळ वनस्पतीच नव्हे, तर सजीवांसह मानवी रोगांचे निदान करणे सोपे होऊ शकते. संदर्भ - अॅग्रोवन २८ जानेवारी १९
0
0
संबंधित लेख