AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Jan 19, 05:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पावसाची शक्यता
राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. संदर्भ - कृषी जागरण २३ जानेवारी १९
5
6