AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jan 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करणे होणार सोईस्कर
मुंबई: शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ‘सौर कृषीपंप योजने’चा लाभ घेता यावा यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोर्टलच्या उद्घाटनावेळी दिली. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध
करून देण्यात आले आहे. या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा खर्च ही वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता इलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – कृषी जागरण, २१ जानेवारी २०१९
18
25