AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Jan 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग नियंत्रण तंत्रज्ञानाचा शोध यशस्वी
जागतिकस्तरावर संत्रा पिकात अतिशय गंभीर समजलेल्या गेलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून निदान न होऊ शकलेल्या संत्रा ग्रीनिंग या रोगाच्या नियंत्रणात ९७ टक्‍केपर्यंत यश आल्याचा दावा केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेकडून करण्यात आला आहे. आय.आय.टी. रुरकी, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरीडा (अमेरिका) आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्‍त संशोधनातून हे शक्‍य झाल्याचे डॉ. मिलिंद लदानिया यांनी गुरुवारी (ता. १७) पत्रपरिषदेत सांगितले. संदर्भ - अॅग्रोवन १७ जानेवारी १८
2
2