पशुपालनअॅग्रोवन
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवा
जनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्याने शरिराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता निर्माण होऊन दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात त्यामुळे वाढे किंवा निकृष्ट चाऱ्यावर चुन्याची प्रक्रिया करावी. चुन्याच्या निवळीची प्रक्रिया - साहित्य: कळीचा चुना, मीठ, झारी, पाणी साठविण्याचा पिंप, उसाचे वाढे इ. प्रक्रिया - • दोन किलो कळीच्या चुन्यात १५ ते २० लिटर पाणी टाकून मातीच्या रांजणात किंवा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ठेवावे त्यातून दर बारा तासांनी ३ लिटर पर्यंत निवळी काढता येईल. त्याचबरोबर मिठाचे २ टक्के द्रावण स्वतंत्र बनवावे. • स्वच्छ व टणक जमिनीवर वाढ्याचा एक थर पसरावा व झारीच्या सहाय्याने त्यावर चुन्याची निवळी व मिठाचे द्रावण फवारावे. त्यावर दुसरा थर देऊन पुन्हा द्रावण फवारावे असे थरावर थर रचून ठेवावेत किंवा कुट्टी करूनही त्यात द्रावण फवारून २४ ते ४८ तासांनी हे वाढे जनावरांना खाऊ घालावेत.
• वाढे वाळवून साठवायचे असल्यास सुद्धा अशी प्रक्रिया करून साठवून ठेवता येइल. प्रक्रियेचे फायदे - • अतिशय स्वस्त व सोपी प्रक्रिया असल्यामुळे निकृष्ट वाढ्याची पौष्टिकता वाढते. • शरीरातील क्षार खनिजांचे प्रमाण टिकून राहिल्याने दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यास मदत मिळते, तसेच प्रजनन क्षमता सुधारते. संदर्भ - अॅग्रोवन
49
0
संबंधित लेख