कृषि वार्ताअॅग्रोवन
कांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ
अकोला : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी कमी दराचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले अाहे. या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी अाता शुक्रवारपर्यंत (ता. २५) मुदतवाढ देण्यात अाली अाहे. १५ जानेवारीपर्यंत असलेली मुदत ही कमी असल्याने शेतकऱ्यांमधून मुदत वाढवून देण्याची मागणी झाली होती. याची दखल घेत अाता शेतकऱ्यांना शुक्रवारपर्यंत (ता. २५) बाजार समितीत अर्ज दाखल करता येणार अाहेत. अर्जासोबत शेतकऱ्याने कांदा विक्री केल्याची पावती, कांदा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, ज्या बँकेत खाते उघडलेले असेल त्या बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अशी कागदपत्रे जोडावी लागणार अाहेत.
राज्यात ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खासगी बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली अशा शेतकऱ्यांना प्रतिकिलो दोन रुपये अनुदान २०० क्विंटल मर्यादेत देऊ करण्यात अाले अाहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अर्ज देण्याचे अावाहन करण्यात अाले होते. संदर्भ - अॅग्रोवन, १७ जानेवारी २०१९
2
0
संबंधित लेख