हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात थंडीचे प्रमाण कमी जाणवेल
राज्याच्या सहयाद्री पर्वत रांगावर १०१४ हेप्टापास्कल,तर पुर्वेस १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आठवडयाच्या सुरूवातीला राहील्यामुळे थंडीचे प्रमाण चांगले राहील. उत्तरेकडील राज्य, कोकण व विदर्भात थंडीचे प्रमाणदेखील अधिक राहील, तर दक्षिण कोकणात थंडीचे प्रमाण कमी राहील, मात्र हे थंडीचे प्रमाण रात्री व पहाटे अधिक राहील, तर दुपारी ते मध्यम राहील. सध्या या आठवडयात कडाक्याची थंडी जाणविणार नाही. हवामान कोरडे राहील. २० जानेवारीला थंडीच्या प्रमाणात अल्पशी वाढ होईल. २१ जानेवारीला विदर्भ व मराठवाडयात थंडीचे प्रमाण वाढेल, तसेच उत्तरेकडील राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहील. २२ जानेवारीलादेखील राज्यात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील, तर २४ जानेवारीला थंडीच्या प्रमाणात किंचित वाढ होईल.
कृषी सल्ला -_x000D_ १. हरभरा पिकास फुले येताना व घाटे भरताना पाणी दिल्यास उत्पादन चांगले येते._x000D_ २. ऊसाची लागवड १५ फ्रेबुवारीपर्यत करावी._x000D_ ३. फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे व खोडाभोवती अच्छादनांचा वापर करावा._x000D_ ४. गव्हाच्या पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार प्रत्येकी २० ते २१ दिवसांनी पाणी दिल्यास उत्पादन चांगले येते. _x000D_ ५. आंबा मोहरावर मिथील डेमेथाॅन १० मिली १० लि पाण्यातून फवारणी करावी._x000D_ संदर्भ - जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डाॅ. रामचंद्र साबळे
2
0
संबंधित लेख