AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Jan 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
‘या’ शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे खावटी कर्ज माफ
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. १५) घेतला.या निर्णयाद्वारे सुमारे ३८५ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घेतलेली खावटी कर्जे माफ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करीत होते. यावर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याला मान्यता यापूर्वीच देण्यात आली.
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अल्पभूधारक व शेतमजूर यांना पावसाळ्यात रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक अडचणींमुळे उपासमार होऊ नये यासाठी खावटी कर्ज दिले जाते. बँकांमार्फत दिले जात असलेले खावटी कर्ज म्हणजेच शेतकऱ्यांना शेती कर्जाव्यतिरिक्त घरगुती गरजा भागवण्यासाठी देण्यात येणारे अल्प रकमेचे तसेच अल्प मुदतीचे कर्ज असते. संदर्भ – अॅग्रोवन, १७ जानेवारी २०१९
1
8