हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात थंडीत चढ-उतार
१९ जानेवारीला राज्याच्या मध्य भागावर उत्तर दक्षिण दिशेने १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल्यामुळे सकाळी व पहाटे थंडीचे प्रमाण अधिक राहील. सह्याद्री पर्वतरांगावर व कोकणात १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे पहाटे हवामान थंड राहील. विदर्भ व मराठवाडयात थंडीचा जोर अधिक राहील.
२० जानेवारीला राज्याच्या पश्चिम भागात थंडीचे प्रमाण मध्यम, तर पूर्व भागावर थंडीचे प्रमाण अधिक राहील. २१ जानेवारीला राज्यात थंडीचे प्रमाण चांगले राहील. २३ जानेवारीला राज्याच्या पश्चिम भागात व मराठवाडयात थंडीचे प्रमाण कमी होईल. कृषी सल्ला: १. जनावरांच्या रोगाचे अचूक निदान होणे आवश्यक आहे – गोचीडपासून ताप येत असल्यास जनावरांच्या रक्ताची तपासणी,जंतांच्या प्रादुर्भावसाठी शेणाचा काही भाग साधारण ५० ग्रॅम,तर अशक्तपणा असल्यास रक्ताची व शेणाची तपासणी करावी. २. दुधाळ जनावरांना संतुलित आहार द्यावा – संतुलित आहार दिल्यास दुध उत्पादन वाढते. दुध उत्पादनाचे सातत्य टिकून राहते. ३. घरगुती पध्दतीने पशुखाद्य बनवावे – शेंगदाणा पेंड व सरकी हे घरगुती पध्दतीने पशुखाद्य बनवून जनावरांना ते दिल्यास आरोग्य उत्तम राहून दूध उत्पादन वाढते. ४. शेळी व मेंढी पालनाच्या केंद्राची माहिती – सुधारित जातीचे मेंढे व बोकड यांच्या पैदासीकरता महामंडळाची वाटप केंद्रे राज्यात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. ५. देशी गाईचे संगोपन महत्वाचे. ६. शेतीला पुरक उद्योगाची जोड असावी, यासाठी शेळीपालन महत्वाचे आहे. संदर्भ - जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डाॅ. रामचंद्र साबळे
5
0
संबंधित लेख