AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jan 19, 05:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
हा आठवडा थंडी राहील
महाराष्ट्र राज्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील व पुर्व किनार पट्टीपर्यत तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे राज्यात ११ जानेवारीला थंडीचे प्रमाण अधिक राहील. १२ तारखेला राज्याच्या मध्य भागावर १०१४ हेप्टापास्कल तर पूर्व भागावर १०१६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहिल्यामुळे मध्य भागात थंडीचे प्रमाण मध्यम, तर पुर्वेकडे थंडीचे प्रमाण जास्त राहील. १३ ते १५ या तारखेला १०१६ इतका हवेचा दाब राहिल्यामुळे या दिवसात राज्यात थंडीचे प्रमाण पुन्हा वाढेल, तर १७ तारखेला थंडीच्या प्रमाणात वाढ होईल.
कृषी सल्ला: १. बागायत क्षेत्रात ऊस व भुईमूगाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. २. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ३. भाजीपाला पिकापैकी भेंडीची लागवड करावी. ४. थंडीचे कमी होताच कलिंगड व खरबूज पिकाची लागवड करावी. ५. ऊसाच्या पाचटावर १० किलो युरिया+१० किलो सिंगल सुपर फाॅस्फेटस+१ किलो पाचट कुजवणाऱ्या जिवाणू पाण्यात मिसळून शिंपडावे. संदर्भ: जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डाॅ. रामचंद्र साबळे
80
18