AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 19, 06:20 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
शेतकऱ्यांना ही मिळणार दरमहा पेन्शन! : चंद्रकांत पाटील
विटा, जि. सांगली: प्रत्येक क्षेत्रातील रोजगाराला महिन्याला पगार मिळत असतो, मात्र या पगारापासून शेतकरी नेहमीच दूर राहिला आहे, मात्र आता हा पगार शेतकऱ्यांना ही मिळणार आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आणली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विटा येथे बळिराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी दिली. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी कामे करत आहेत. निधीअभावी अर्धवट राहिलेल्या कामांसाठी केंद्राने साडेचार वर्षांत चोवीस
हजार कोटी रुपये दिले आहेत, त्यामुळे टेंभू, उरमोडी योजनांसारखी कामे सुरू झाली. ८७ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला. दोन हजार नऊशे कोटी रुपयांची विमा भरपाईदेखील शेतकऱ्यांना मिळाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ६ जानेवारी २०१९
3
10