AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 19, 06:00 PM
कृषी वार्तालोकमत
या योजनेसाठी शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० टक्के अनुदान
केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात शेतीतील उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी ‘वन शेती उपअभियान’ ही योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या लाभार्थ्यास रोप वाटिकेसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे,  हा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या  उपअभियानाची अंमलबजावणी
व नियोजनामध्ये वनविभागाचा सहभाग असून, त्यासाठी राज्यस्तरावर योजना अंमलबजावणीकरिता एक समन्वयक नियुक्त केला जातो. या योजनेचा नोडल विभाग म्हणून कृषी अधिकारी कार्यालयाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे सॉईल हेल्थ कार्ड असणे आवश्यक असून निवड झालेल्या लाभार्थ्यास तातडीने कार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची आहे. संदर्भ – लोकमत, १ जानेवारी
5
9