हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
थंडीचे प्रमाण अधिक राहील
राज्याच्या मध्यावर उत्तर दक्षिण दिशेने १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे पुर्व विदर्भ,मराठवाडा,पुर्वेकडील पश्चिम राज्याच्या भागावर १०२० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील म्हणजेच या भागात किमान तापमानात मोठी घसरण होईल आणि मध्यापासून पुर्वेकडील भागात निचांकी तापमानाची नोंद होईल हीच परिस्थिती उत्तरेकडील राज्यातील पूर्वभागात ही राहील. ६ जानेवारीला हवेच्या दाबात किंचीत वाढ होऊन ते १०१६ हेप्टापास्कल इतका कमी होईल. ७ जानेवारीलादेखील राज्यात थंडीचे प्रमाण वाढेल. ८ जानेवारीला उत्तरेकडील राज्ये, विदर्भ व मराठवाडयात थंडीचे प्रमाण अधिक राहील मात्र दक्षिणेकडील राज्यात तुलनेने ते किंचीत कमी राहील मात्र थंडीचा जोर कायम राहील. ९ व १० जानेवारीला कडाक्याचे थंडीचे प्रमाण कायम असेल.
कृषी सल्ला - १. पुणे,नगर,गोदिंया,भंडारा,चंद्रपूर,नागपूर,नाशिक व जळगाव जिल्हयात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील्यामुळे या भागातील फळबागेत सकाळी ६ वाजता शेकोटया पेटवल्यास बागेतील वातावरणाचे तापमान वाढेल व नुकसान पातळी कमी करता येईल,तसेच या भागात पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास नुकसान पातळी कमी करणे शक्य होईल. २. जनावरे शेडमध्ये बांधावीत.झाप बांधून शेंड बंदिस्त ठेवावीत. ३. जनावरांना लाळ व खुरकत रोगाची प्रतिबंधक लस टोचावी. ४. कुक्कुटपालन शेडमध्ये रात्री बल्ब लावावेत. संदर्भ - ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
14
0
संबंधित लेख