AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jan 19, 06:00 PM
कृषी वार्तालोकमत
शेती संदर्भातील जागृतीसाठी ‘हा’ कार्यक्रम राबवितात
कृषी विद्यापीठातील संशोधनाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व्हावा, विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये पीक परिस्थितीची पाहणी व्हावी तसेच त्यावर त्वरित रोग नियंत्रण व कीडनियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी या हेतूने कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये माहे जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान ‘जिल्हा मासिक चर्चा’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो.
या कार्यक्रमात सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व कृषी संलग्न इतर विभागांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन तालुक्यातील पीक परिस्थितीवर चर्चा करणे, पिकांवरील कीड व रोग परिस्थितीवर पर्याय शोधणे, कृषी विद्यापीठातील नवसंशोधित तंत्रज्ञानावर चर्चा करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटींचे आयोजन करून त्या अनुषंगाने चर्चा केली जाते. या चर्चासत्रांची फलनिष्पत्ती जाणून घेण्यासाठी शासनाने यापूर्वी मूल्यमापन केलेले आहे. या मासिक चर्चासत्र कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. संदर्भ - लोकमत, २८ डिसेंबर २०१८
2
1