कृषि वार्ताकृषी जागरण
कृषी क्षेत्राला अधिक मजबूत बनविणार – कृषी मंत्री
कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांनी कृषी संशोधन व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शेतीसंबंधी अधिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर कृषी क्षेत्राला अधिक मजूबत कसे बनविता येईल यावर संशोधन करण्यास सांगितले आहे.
या बैठकीमध्ये तोमर यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास आणि लघुवर्गीय शेतकऱ्यांकरिता तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर विशेष लक्ष देण्यास सांगितले. त्याचबरोबर एकीकृत शेती, पडीक जमीन व दुष्काळग्रस्त भागात तंत्रज्ञानाचा विकास करण्यावर जोर देण्यासदेखील सांगितले आहे. कृषी संशोधन असे असावे की, देश व समाजालादेखील अभिमान वाटेल व भविष्यातील पिढीला कृषी क्षेत्रातून उत्पादन व उत्पन्न अधिक मिळेल याच्यावर त्यांचा विश्वास बसला पाहिजे. संदर्भ - कृषी जागरण, ६ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
73
0
संबंधित लेख