कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी बाजार विकासासाठी जर्मनी व भारतमध्ये करार
नवी दिल्ली – भारत व जर्मनीमध्ये देशामध्ये कृषी बाजारात विकासात सहयोगासाठी करार केला आहे, या दोन्ही देशात संयुक्त करारावर हस्ताक्षरदेखील केले आहे. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, २०२२ पर्यंत कृषी व संबंधित क्षेत्रात सुधारित उत्पादकता, खर्च कमी करणे, स्पर्धात्मक बाजाराची उपलब्धता या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे ध्येय आहे.
या संयुक्त करारावर भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर व जर्मनीचे कृषी अन् खादय मंत्री जुलिया क्लाकनर यांनी या करारावर हस्ताक्षरदेखील केले आहे. तोमर म्हणाले, निर्यात नीतीचे लक्ष्य २०२२ पर्यंत दुप्पट करून सहा करोड डॉलर करायचे आहे. _x000D_ जुलिया क्लाकनर यांनी सांगितले की, जर्मनी कृषी यांत्रिकीकरण व काढणीनंतरच्या व्यवस्थापनात आमच्याकडे कृषी तंज्ञ आहेत. जे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. या दोन्ही मंत्र्यानी कृषी यांत्रिकीकरण, काढणीनंतरचे व्यवस्थापन व शेतीशी संबंधित अनेक मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली. _x000D_ संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, १ नोव्हेंबर २०१९ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
684
0
संबंधित लेख