सल्लागार लेखAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीवर पिठ्या ढेकुणच्या नियंत्रणासाठी सल्ला
कापूस पिकामध्ये सध्य स्थितीत मिली बग म्हणजेच पिठ्या ढेकुण या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. साधारणपणे कापसाचे आवरण असलेली आणि राखाडी रंगाची कीड जी पिकाच्या कोणत्याची अवयावर प्रादुर्भाव करत असते. आजच्या परस्थितीत मिली बग कापसाच्या मुख्य खोडावर आढळत आहे. जुलै आणि येणाऱ्या ऑगस्ट महिण्यात तापमान उष्ण राहिल्यास याचा प्रादुर्भाव अझुनही वाढू शकतो. सर्वात महत्वाचे या किडीच्या अंगावर जे कापसासारखे आवरण असते त्यामुळे कोणत्याही किटकनाशकांचा प्रभाव तितका मिळत नाही आणि कीड नियंत्रणात येण्यासाठी वेळ जातो. याठिकाणी आपण मिली बग्स तथा पिठ्या ढेकुण किडीचे नियंत्रणाचे एकात्मिक व्यवस्थापन पाहू. 1. प्रथम बाब आपले शेत तण विरहित असणे खुप महत्वाचे आहे, अगर कपाशीच्या शेतात तणांचे नियंत्रण नसेल तर मिली बग कीड गवतावर राहून त्याची संख्या वाढत राहील आणि नियंत्रण प्रभावी होणार नाही. 2. जैविक नियंत्रण करावयाचे असल्यास मित्र किटक लेडी-बर्ड बिटल हेसुद्धा प्रभावीपणे काम करते. सदर बिटल कपाशीच्या शेतात जोपासणे गरजेचे असते आणि त्यांची संख्या कमी होऊ नये यासाठी कुठलेही रसायन फवारणी करणे टाळावे. आताच्या हवामानात लेडी बर्ड बिटल चांगले काम करतीलही परंतु कपाशी पिकाचा कालावधी जास्त नसल्याने या पद्धतीचा प्रभावी वापर तितका शक्य नाही. 3. दुसरे जैविक नियंत्रण करण्यासाठी मित्र बुरशी व्हर्टीसेलीयम लेकॅनी @ 10 ग्रॅम/लिटर या द्रावणाची फवारणी करावी. सदर मित्र बुरशी मिलीबग तसेच इतर रस-सोषक (मावा, तुडतुडे, फुलकिडे इ.) किडीवर जगते आणि कीड नष्ट करते. व्हर्टीसेलीयम लेकॅनी वापरानंतर आपल्याला किटकनाशकांचा वापर करता येतो परंतु कुठलेही बुरशीनाशक फवारणी करता येत नाही. 4. रासायनिक नियंत्रण- यामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक किटकनाशकांचा वापर आपण करू शकतो जसे की प्रोफेनोफॉस, बुप्रोफेंझिन फवारणी, इमिडा किंवा क्लोथीआनिडीन मुळांद्वारे देऊ शकतो. रासायनिक नियंत्रण करतेवेळी कोणत्याही किटकनाशकात चांगल्या गुणवत्तेचे सिलिकॉन बेस स्टीकर वापरावे ज्याद्वारे परिणाम त्वरित जाणवतील. प्रोफेनोफॉस (प्रोफेक्स, क्युराक्रोन) 25 मिली प्रती पंप, किंवा ब्युप्रोफेन्झीन (अँपल, अप्लौड) 25 मिली प्रती पंप, टाटा-झिनी 250 ग्रॅम दोन एकर कपास फवारणीसाठी वापरावे सोबत निंबोळी अर्क किंवा मासळी अर्क फवारल्यास जास्त परिणामकारक नियंत्रण मिळवता येऊ शकते. ठिबक असल्यास ड्रिपद्वारे इमिडाक्लोप्रीड (प्रोन्टो, अडमायर) @ 100 ग्रॅम एकरी किंवा क्लोथीआनिडीन (डेंटात्स्यु) @ 40 ग्रॅम एकरी दिल्याने चांगले नियंत्रण मिळेल.
वरील प्रमाणे आपण मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकुण नियंत्रण करू शकतो तसेच कापसाच्या आणि इतर पिकांच्या अधिक माहितीसाठी अॅग्रोस्टार च्या टोल फ्री नंबर १८०० १२० ३२३२ वर मिस्ड कॉल करा.
110
0
संबंधित लेख