AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Aug 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
आंब्याची नवी जात विकसित
नाशिक: बंगळूर येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी आंब्याची अर्का सुप्रभात (H-14) ही संकरित जात विकसीत केली आहे. ही जात ‘आम्रपाली’ व ‘अर्का’ अनमोल या जातींच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे. भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेतील फळपिके विभागाचे संचालक डॉ. एम.शंकरन, डॉ. सी. वासुगी यांनी ही जात विकसित करण्यासाठी संशोधन केले आहे. जातीचे वैशिष्टये १. कलम मध्यम उंच वाढणारे, पसरणाऱ्या फांदयाची रचना. २. दरवर्षी फळांचे उत्पादन, फळे घोसामध्ये लागतात. ३. लागवडीनंतर चार वर्षांनी प्रतिकलम 35 ते 40 किलो फळांचे उत्पादन. ४. प्रतिफळ वजन 240-250 ग्रॅम, फळाचा आकार हापूसासारखा. ५. फळामध्ये गराचे अधिक प्रमाण, गराचा रंग आम्रपाली जातीसारखा गडद नारिंगी. ६. फळामध्ये गराचे प्रमाण 70 टक्के, टीएसएस प्रमाण 22 ब्रिक्सपेक्षा जास्त, आम्लता 0.12 टक्के ७. फळात कॅरोटीनॉइड्चे प्रमाण 8.35 मिलिग्रॅम व फ्लेव्होनॉइड्से प्रमाण 9.91 मिलि ग्रॅम प्रति 100 ग्रॅम फळ वजन ८. सामान्य तापमानाला काढणीनंतर 8 ते 10 दिवस टिकवण क्षमता संदर्भ: अॅग्रोवन, 1 ऑगस्ट 2019
142
14