कृषि वार्ताकृषी जागरण
आता, मशीनने जाणून घ्या, फळामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण!
आता फळ आणि भाज्यांमध्ये रसायने किंवा कीटकनाशके सहज शोधता येणार आहेत. भारतीय विज्ञान संस्थान व अनुसंशोधन संस्थान (आईआईएसईआर) तिरूअनंतपुरमच्या विदयार्थ्यांच्या एका टीमने ही मशीन तयार केली आहे, या मशीनच्या मदतीने खतरनाक कीटकनाशकाचे प्रमाण सहजपणे शोधू शकता. कीटकनाशकांची तपासणी करण्यासाठी सर्वात पहिले फळ व भाज्यांच्या रसाचा नमुना काढून कागदाच्या पट्टीवर ठेवा. रमन स्पेक्ट्रोमीटर युक्त या मशीनमध्ये पेपर स्ट्रीप घालताच, रसच्या नमुन्याची स्पेट्रमची माहिती स्क्रीनवर दिली जाईल. मशीनवर दाखविण्यात आलेले कीटकनाशकाच्या प्रमाणाचे मुल्यांकन करून आपण फळ व भाजी खाण्याच्या योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊ शकता. आतापर्यंत फळ व भाज्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जाणण्यासाठी लगभग ७ ते ८ दिवस लागायचे, मात्र या मशीनच्या शोधामुळे ५ तासातच कीटकनाशकाचे प्रमाण जाणण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की, लवकरच ही मशीन बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. संदर्भ: कृषी जागरण, ६ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
62
0
संबंधित लेख