मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाला चांगली सुरूवात
महाराष्ट्रात या आठवडयात सर्वच भागात पावसाची चांगली सुरूवात आहे. 5 ते 7 ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्र या भागात हवेचे दाब कमी असल्याने, या भागात पावसाचा जोर अधिक राहील. 8 ऑगस्टला मुंबईसह पालघर, उत्तर महाराष्ट्र व विदर्भावरील हवेचे दाब 998 हेप्टापास्कल कमी होत असल्याने, काही भागात अतिवृष्टी होईल अशा प्रकारे मान्सून या आठवडयात काही ठिकाणी मुसळधार, तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अधूनमधून पावसाचा जोर कायम राहील. मुंबईसह व मुंबई परिसरातील ठाणे, रायगड या भागात, तर रत्नागिरी व पालघर जिल्हयातही अतिवृष्टी होणे शक्य आहे. कृषी सल्ला: १. भाताचे पीक फुटव्यांचे अवस्थेत असताना, खाचरात २ ते ३ सेंमी पाणी पातळी ठेवावी. मात्र फुटण्यांची चांगली वाढ होताच, पाणी पातळी वाढवून ती ५ से.मी ठेवावी. २. जेथे अतिवृष्टीची शक्यता आहे, विशेषत: कोकणात व कोल्हापूर जिल्हयात शेतीच्या एका कोपऱ्यातून शेतीमध्ये साठलेले पाणी निचरा करावे व शेतीमध्ये पाणी साठवू देऊ नये. ३. गोकूळ अष्टमीपूर्वी शेतीची पूर्व मशागत करून, गोकूळ अष्टमीनंतर रब्बी ज्वारीची पेरणी करावी. ४. शेतीतील तण काढावे, त्यासाठी आंतर मशागत करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
69
0
संबंधित लेख