AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्ताराजस्थान पत्रिका
तांदूळ निर्यादारांना मिळणार दिलासा
नवी दिल्ली – भारतीय तांदूळ निर्यातदारांना सौदी अरब या देशाचे कडक नियम ३१ डिसेंबरपासून लागू होणार आहे. या कारणामुळे काही अंशी तांदूळ निर्यातदारांना दिलासा मिळाला आहे. सौदी फूड एंड ड्रग अथॉरिटी (एसएफडीए) यांनी भारतीय निर्यातदारांशी मिनिमम रेजिड्यू लेवल्स (एमआरएल) टेस्ट रिपोर्टसोबत त्यांचे पालन ही करण्यासाठीचे सर्टिफिकेट देण्याची मागणी केली आहे. हे नियम सर्वप्रथम १ सप्टेंबरपासून लागू होणार होते, मात्र आता ते डिसेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
सौदी फूड एंड ड्रग अथॉरिटी यांनी भारतीय निर्यातदारांना बासमती तांदळाच्या वाणाची प्रामाणिकतासाठी डीएनए टेस्टची ही मागणी केली आहे. त्यांनी निर्यातदारांना अथॉरिटीकडून मंजुरी प्राप्त गुड एग्रिकल्चर प्रॅक्टिस जीएपी सर्टिफाइड फार्मवरूनच तांदूळ खरेदीसाठी सांगितले आहे. सौदी अरब भारतीय बासमती तांदळाचे प्रमुख खरेदीदार आहेत. भारतातून वर्षभरात ४०-४५ लाख टन बासमतीची निर्यात होते, ज्यामध्ये २० टक्के वाटा सौदी अरब या देशाचा असतो. ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय सेतिया यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सौदी अरबला पोहचणारे शिपमेंटमध्ये भारतीय बासमती तांदूळ एसएफडीएच्या प्रस्तावित नियमांच्या बाहेर होईन. त्याचबरोबर निर्यातक बासमतीची मिश्रण गुणवत्ताच्या हिशोबाने लेबल लावतील, जेणेकरून अधिक पारदर्शिकता आणली जाईल. संदर्भ – राजस्थान पत्रिका, ५ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
0