कृषि वार्तापुढारी
३०० टन आंब्याची निर्यात सातासमुद्रापार!
राज्य कृषी पणन मंडळाच्या विविध ठिकाणच्या निर्यात सुविधांचा लाभ घेऊन आतापर्यंत सुमारे ३०० टन आंब्यांची निर्यात पूर्ण झाली आहे. सध्या मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप, न्युझीलंड व आखाती देशात आंबा निर्यात झालेली आहे. त्याचबरोबर जपानला ही येत्या आठवडयात आंबा निर्यात होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा साठ टक्क्यांच्या आसपास वाटा आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील बैंगनपल्ली व गुजरातमधील केशर आंबाही निर्यात होत आहे. केंद्र सरकारची अपेडा संस्था, राज्याचा कृषी विभाग व पणन मंडळाच्या सहकार्याने विविध निर्यात सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. निर्यातीपूर्वी संबंधित देशांचे शास्त्रज्ञ सुविधा केंद्रांवर उपस्थित राहून निर्यातीला आंबा रवाना होण्यापूर्वी त्यांच्या देशाच्या अटींप्रमाणे त्यावर योग्य त्या प्रक्रिया त्यांच्यासमोर केल्या जातात. या प्रक्रियनेतर देण्यात येणाऱ्या सुविधा केंद्रांवरील प्रमाणपत्रानंतरच आंबा निर्यातीला हिरवा कंदील दाखविला जातो. संदर्भ – पुढारी, ५ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0
संबंधित लेख