कृषी वार्तान्यूज18
शासनाची ऑनलाइन बाजारपेठ ‘ई-नाम’शी जोडले १.६५ करोड शेतकरी!
नवी दिल्ली – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी शासनाच्यावतीने सुरू केलेली ऑनलाइन बाजारपेठ यशस्वी होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील जवळजवळ १.६५ करोड शेतकरी या बाजारपेठेशी जोडलेले आहेत. याचे नाव राष्ट्रीय कृषी बाजार योजना आहे. २०१७ पर्यंत ई-बाजारपेठेशी फक्त १७ हजार जोडले होते. ई-नाम नावाचे एक इलेक्ट्रॉनिक कृषी पोर्टल आहे, जे पूर्ण भारतात कृषी उत्पादन मार्केटिंग कमेटीचे एक नेटवर्क जोडण्याचे काम करते. याचा हेतू म्हणजे कृषी उत्पादनासाठी राष्ट्रीय स्तर वर एक बाजार उपलब्ध करायचे आहे. हा फायदा पाहता, शेतकरी वेगाने या पोर्टलला जोडले जात आहेत.
ई-नाम अंतर्गत देशातील विभिन्न राज्यांमध्ये स्थित कृषी उत्पादन बाजारपेठेला इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेले आहे. हे देशामध्ये विभिन्न कृषी वस्तूंना विकण्यासाठी एक ऑनलाइन ट्रेडिंग प्लेटफॉर्म आहे. हे बाजार, शेतकरी, व्यापारी व ग्राहकाला वस्तूंची ऑनलाइन टेड्रिंगची सुविधा प्रदान करतात. ई-नाममुळे आता शेतकरी व ग्राहकांच्यामध्ये कोणताही दलाल नाही. यामुळे फक्त शेतकरीच नाही, तर ग्राहकांना ही याचा फायदा होणार आहे. संदर्भ – न्यूज १८, ५ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
272
1
संबंधित लेख