कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
खरीफमध्ये १४.७९ कोटी टन खाद्यान्न उत्पादनचे लक्ष्य
केंद्र सरकारने खरीफ हंगाम २०१९-२० मध्ये देशात १४.७९ कोटी टन खाद्यान्न उत्पादनचे लक्ष्य निश्चित केले आहे. खरीफमधील प्रमुख पीक भाताचे उत्पादनचे लक्ष्य १०.२ कोटी टन आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने नुकतीच सामान्य मान्सून राहण्याची भविष्यवाणी केली होती.
खरीफ परिषद २०१९ मध्ये, अधिकाऱ्यांच्या मते, आगामी खरीप हंगामात भाताचे उत्पादन लक्ष्य १०.२ कोटी टन निश्चित केले आहे, तर इतर आरंभिक अंदाजानुसार, खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये भाताचे उत्पादन १०.१९ कोटी टन होण्याची शक्यता असून, मक्काचे उत्पादन लक्ष्य २१३ लाख टन निश्चित केले आहे. अगामी खरीपमध्ये डाळीच्या उत्पादनचे लक्ष्य १०१ लाख टन आणि तेलवर्गीयांचे उत्पादन लक्ष्य २५८.४ लाख टन निश्चित केले आहे. कापसाचे उत्पादन लक्ष्य ३५७.५ लाख गाठ (एक गाठ -१७० कि.ग्रॅ) लक्ष्य आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0
संबंधित लेख