कृषी वार्ताअॅग्रोवन
कोरोना विषाणुमुळे साखरेच्या दरात घसरण
कोरोना विषाणूचा फटका साखर निर्यातीला बसला आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच उच्च पातळीवर आलेले आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर झपाटयाने खाली आली आहेत. बहुतांशी देशांनी व्यापाऱ्यांवर मर्यादा आणल्याने हजारो टन साखर विविध बंदरांवर पडून आहे. याचा परिणाम निर्यातीवर ही होणार आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखर कमी असल्याने भारतीय साखरेला मागणी वाढत होती. यामध्ये ३८ लाख टन साखरेचे करार झाले आहेत. यापैकी २२ लाख टन साखर निर्यात झाली आहे. उर्वरित १६ लाख टन साखर मात्र मध्येच अडकली आहे. कोरोना रोग जसा पसरत गेला, तसे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या. याचा फटका साखरेलाही बसला. देशांकडून व्यापार बंद होत असल्याने देशातून साखर परदेशात जाणे अशक्य बनले आहे. कित्येक टन साखर देशात शिल्लक असल्याने साखरेच्या दरात घसरण झाली आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, १४ मार्च २०२० ही महत्वपूर्ण माहिती पसंद पडल्यास लाइक करा अन् शेअर करा
44
7
संबंधित लेख