कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कांदा, टोमॅटोच्या कमी किंमतीसाठी शासन वाढविणार पुरवठा
केंद्र शासन कांदा व टोमॅटोसोबतच डाळींचा ही साठा वाढविणार आहे. ज्यामुळे यांच्या किंमतीमध्ये वाढ होणार नाही. याविषयी स्थायी समितीच्या बैठकीत उपभोक्ता प्रकरणाचे सचिव अविनाश के श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली हे सांगण्यात आले. शासन केंद्रीय पुरवठयाच्या माध्यमातून डाळींची विक्री वाढविणार आहे. केंद्रीय पुरवठयामध्ये तूर डाळ ८६ रू. प्रति किलोच्या किंमतीने विकत आहे तसेच नाफेडने केंद्रीय पुरवठा, सफल व एनसीसीएपला ८० ते ८५ रू. प्रति किलो किंमतीने डाळ विकण्याचे आदेश देण्यात आले आहे. नाफेडजवळ डाळींचा पुरवठा जास्त आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नाफेडला जिथे सरासरीपेक्षा जास्त किंमत आहे, अशाच ठिकाणी डाळ विकण्याचे आदेश दिले आहे. या बैठकीमध्ये सांगण्यात आले की, टोमॅटोच्या किंमती पहिल्याच्या तुलनेत कमी झाली आहे, मात्र पुढे ही या किंमती आणखी घटतील असा अंदाज आहे. खरीप कांदयाच्या आवकमध्ये वेग आला आहे व किंमती आधीपासूनच कमी होत आहे. नाफेडने सांगितले की महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्यामुळे कांदयाची आवक पुढे आणखी वाढेल. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २३ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
61
0
संबंधित लेख