AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 May 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
एप्रिल २०२० पर्यंत विना प्रमाणीकरण विक्री होणार जैविक उत्पादनाची
भारतीय खादय सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफ एस एस ए आई) च्या नवीन अहवालानुसार, एप्रिल २०२० पर्यंत, लहान जैविक उत्पादक म्हणजेच ज्यांचा वार्षिक टर्नओवर १२ लाखापेक्षा कमी आहे, असे उत्पादन आता थेट विना प्रमाणीकरणशिवाय ग्राहकांना जैविक उत्पादनाची विक्री करू शकतात. मात्र ते आपल्या उत्पादनावर "भारतीय जैविक लोगो" लावू शकत नाही.
याचा लाभ ५० लाखपर्यंत वार्षिक टर्नओव्हर करणारे "" अॅग्री गेटर्स"" यांनादेखील होणार आहे. जैविक उत्पादनांची किरकोळ विक्री करणाऱ्या संस्थांना प्रमाणीकरण करण्याचे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. २०१७ च्या नियमानुसार, जैविक उत्पादन विक्रीसाठी नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन (एनपीओपी) किंवा पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम (पीजीएस) कडून प्रमाणित करणे आवश्यक आहे. जैविक उत्पादन विक्रीसाठी या नियमांमध्ये सवलत मिळल्याने जैविक उत्पादनांना फायदा मिळण्यासोबतच लघु आणि सीमांत शेतकरी जैविक शेतीसाठी प्रेरित होतील. संदर्भ – कृषी जागरण, २१ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
0