हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
हा आठवडा जास्त उष्णतेचा जाणवेल
राज्यातील कमाल व किमान तापमानात वाढ होऊन उत्तरेकडील राज्यात ४४ ते ४५ अंश, मराठवाडयात ४४ ते ४६ अंश, विदर्भात ४४ ते ४५ अंश व पश्चिमकडील राज्यात ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्यावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कलपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात ही वाढ होण्याची शक्यता असून, सकाळी व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत प्रचंड घट होईल व उष्णतेची लाट येईल. यामुळे हा आठवडा अतिउष्ण व कोरडे राहील. आकाश अंशत: ढगाळ राहणे शक्य असून, वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे उष्णतेची लाट जाणवेल. मात्र ३० एप्रिलला दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला: १. कमाल व किमान तापमानात वाढ होऊन आर्द्रतामध्ये घट होणार असल्याने, या आठवडयात पिके, जनावरे व पशुपक्ष्यांची पाण्याची गरज वाढेल. २. जनावरांना दिवसातून ४ ते ५ वेळा पाणी द्यावे. ३. कुक्कुटपालनास मुबलक पाणी द्यावे. ४. पिकांवर केओलीन द्रावणाची फवारणी करावी. ५. फळबागांना आच्छादन करावे. ६. नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना सावली करावी. ७. शेतीतील कामे सकाळी व सायंकाळी करावीत. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
35
0
संबंधित लेख